आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा म्हणाला, मला तू मला खूप आवडतेस त्यानंतर केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निगडी भागात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित बाळासाहेब नायभल असे युवतीचा विनयभंग करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. 

 


अल्पवयीन मुलगी भाजी आणण्यासाठी चिखली येथील भाजी मंडईत चालली होती. त्यावेळी अभिजितने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तिची वाट अडवून तिला थांबवले आणि तू मला खूप आवडतेस, पूर्वी मी तुझ्या घराजवळ राहात होतो. तू माझ्याशी बोलत जा मला भेटत जा असे सांगितले. मात्र त्याला विरोध करत या मुलीने तुझा माझा काहीही संबंध नाही, माझा पाठलाग करू नकोस असे बजावले. त्यानंतर अभिजितने तिचा विनयभंग केला. तसेच घडला प्रकार कोणाला सांगितलास तर ठार करेन अशी धमकीही दिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. अभिजित नायभल फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...