आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई आणि 10 महिन्‍यांच्‍या बाळाची गळा दाबून हत्या, पिंपरी चिंचवडमध्‍ये खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- येथील हिंजवडी परिसरातील नेरे गावच्या हद्दीत महिलेचा आणि तिच्या 10 महिन्यांच्या बाळाचा अज्ञातांनी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल शनिवारी रात्री दहाच्या सुमारास नेरे रोडवर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्‍लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस करत आहेत.


अश्विनी दत्ता भोंडवे, अनुज दत्ता भोंडवे अस खून करण्यात आलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्ता भोंडवे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी दत्ता भोंडवे, मयत पत्नी अश्विनी, दहा महिन्याचा मुलगा अनुज हे सर्व दुचाकीवरून डांगे चौक येथील पत्नीच्या आईकडे गेले होते. ते परत घरी येत असताना हायवेवर पाणी पिण्यासाठी दुचाकी थांबवली. त्यावेळी अचानक दोन इसमानी गळ्याला चाकू लावला आणि नेरे रोडवर घेऊन गेले. त्‍यानंतर दोघांनाही दोरीने बांधले आणि अज्ञात इसमांनी गळा दाबला. गळा दाबल्याने फिर्यादी दत्ता भोंडवे हे बेशुद्ध झाले तर पत्नीचा मृत्यू झाला. मुलगा रडत असल्याने त्याचे तोंड दाबले यात त्याचा देखील मृत्यू झाला. यानंतर अज्ञात इसमानी गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. काही वेळा नंतर दत्ता भोंडवे यांना शुद्ध आली. तोपर्यंत त्यांना त्यांच्या भावाचे फोन येऊन गेले होते. नंतर त्यांनी भावाला संपर्क केला.  भाऊ आणि काही व्यक्ती आल्यानंतर दत्ता आणि पत्नी, मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र तोपर्यंत आई आणि दहा महिन्याच्या अनुजचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात दत्ता भोंडवे यांनी फिर्याद नोंदवली आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत

बातम्या आणखी आहेत...