आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा जिल्हा नकाशावरुन हटवण्याचा डाव होता, पण तो मी हाणून पाडला : उदयनराजे भोसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. बारामती जिल्हा निर्मितीसाठी सातारा जिल्ह्याचे नाव नकाशावरुन हटवण्याचा प्रयत्न होता पण तो डाव मी हाणून पाडला असा दावा उदयनराजे यांनी केला आहे. ते काल साता-यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यावरही निशाना साधला. 

 

उदयनराजे यांनी सांगितले, तुमच्या तोंडचा घास कोणी हिसकवणार असेत तर कुणी गप्प बसेल, मी तर मुळीच नाही गप्प बसणार. ते पुढे म्हणाले, "मी नसतो तर साताऱ्यातील अनेक ऑफिस हे बारामतीला गेले असते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सातारा जिल्हा ठेवायचा नव्हता, तो बारामतीला जोडायचा प्लॅन होता. बारामती जिल्हा आणि कराड जिल्हा. तुम्हाला सातारा नावच दिसले नसते. नंतर म्हणायचे पक्षाला घरचा आहे. तुम्ही जर आमच्या तोंडचा घास हिसकावत असाल तर कोण गप्प बसणार?बाकीचे गप्प बसतील मी गप्प बसणार नाही."

 

सातारा एमआयडीसीतील राजकारणावरुन उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे आणि रामराज निंबाळकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सातारा एमआयडीसीचे नाव खराब झाले आहे. एलएमची नवी कंपनी साताऱ्यात येत होती. पाहणी करायला आल्यावर त्यांना माझ्या काकांनी ( कै अभयसिंहराजे भोसले) पैसे मागितले आणि ती कंपनी गेली. कंपन्या येतच नाहीत. कंपनी स्थापन झाल्यानंतर त्या त्या कंपनीमध्ये तेथील जमीन धारकांना नोकऱ्या मिळायल्या पाहिजेत. प्रत्येकाचे व्ययक्तिक इंटरेस्ट आहेत अशी टीका त्यांनी रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता केली. 

 

बातम्या आणखी आहेत...