आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिपक मानकर यांच्‍या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अाणि पुण्याचे माजी उपमहापाैर दिपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी घेण्यास मुंबर्इ उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने ही नकार दिला अाहे. त्यामुळे मानकर यांना अाता पुन्हा नव्याने वेगळया खंडपीठापुढे जामीनाकरिता याचिका अर्ज करावा लागणार अाहे.

 

पुणे पाेलीस दलातील कर्मचारी शैलेश जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप याने नुकतीच रस्ता पेठ येथील जमिनीच्या प्रकरणात मानकर याच्यासाेबतच्या वादातून घाेरपडी येथे रेल्वे समाेर उडी मारुन अात्महत्या केली हाेती. याप्रकरणी जगताप याने अात्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली हाेती व त्यामध्ये अात्महत्येस नगरसेवक दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी व इतर चारजण जबाबदार असल्याचा उल्लेख केला हाेता. याप्रकरणी पाेलीसांनी मानकर यांचेसह इतरांवर अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी दिपक मानकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुरुवातीला शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला हाेता.


मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्याने मानकर यांनी मुंबर्इ उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती साधना जाधव अाणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्‍या खंडपीठाने गंभीर प्रकरण असल्याचे सांगत मानकर यांचा जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मानकर यांनी न्यायमूर्ती प्रकाश नार्इक यांचे खंडपीठापुढे याचिका दाखल केली. मात्र, बुधवारी संबंधित न्यायालयानेही मानकर यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे पुन्हा नव्याने दुसऱ्या खंडपीठापुढे मानकर यांनी याचिका दाखल केली. तिसऱ्या खंडपीठानेही मानकर यांच्‍या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्याने मानकर यांच्‍या अडचणीत वाढ झाली अाहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...