आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कोंढव्यात टूरिस्टवाल्यांकडून पार्किगच्या वादातून इंजिनिअर असलेल्या युवकाचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोंढव्यात लूलानगर येथे टूरिस्टवाल्यांकडून पार्किगच्या वादातून इंजिनिअर असलेल्या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. नेव्हल बत्तीवाला  असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या घरासमोर टूरिस्टवाले आपल्या गाड्या पार्क करत त्यातून हा वाद झाला होता.  

 

 

यापूर्वीही वाहनमालकांमध्ये आणि नेवलमध्ये याच कारणावरून वाद झाले होते. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे टुरिस्ट गाड्या पार्क करण्यासाठी चालक आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने संतापलेल्या वाहनचालकाने हातात असलेल्या लोखंडी रॉडने नेव्हिलवर वार केले. चालकासोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनीही नेव्हलला मारहाण केली आणि घटनास्थळाहून पळ काढला. गंभीररित्या जखमी झालेल्या नेव्हलला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून 2 जण गायब आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...