आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेतेवारच्या चॅनेलची १५ काेटींची म्युझिक सिस्टिम जप्त हाेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- समृद्ध जीवनच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांचा घाेटाळा केल्याप्रकरणी महेश माेतेवार याची पहिली पत्नी वैशाली माेतेवार हिला सीअायडीच्या पथकाने अटक केली अाहे. तिच्या चाैकशीत समृद्ध जीवन कंपनीचे नाव बदलून इलेग्नस एंटरटेनमेंट प्रा.लि. या नावाने नवीन कंपनी सुरू करून त्याद्वारे ‘मी मराठी’ हे चॅनेल माेतेवार चालवत हाेता. सदर नवीन कंपनीत त्याने पाच ते १५ काेटींची म्युझिक सिस्टिम मुलगा अभिषेक माेतेवार याच्या साथीने परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाले अाहे. ही म्युझिक सिस्टिम पाेलिसांना जप्त करायची असल्याचे सीअायडीच्या तपास अधिकारी पाेलिस अधीक्षक ज्याेती क्षीरसागर यांनी न्यायालयात सांगितले.  न्यायालयाने वैशाली हिला  १२ जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत.    


एमपीअायडी कायद्यानुसार ही म्युझिक सिस्टिमबाबत कार्यवाही करणे अावश्यक असल्याचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करताना सांगितले. वैशाली माेतेवार हिने दाेन वर्षांच्या फरार काळात मुलगा अभिषेक माेतेवार याला पावर अाॅफ अॅटर्नी देऊन भाचा प्रसाद पारसवार यांच्या मदतीने स्वत:च्या नावावर असलेल्या दाेन मालमत्ता तसेच लँडस्टार कन्स्ट्रक्शन, जीवन ज्याेती कन्स्ट्रक्शन या कंपन्यांच्या नावे असलेल्या मळवली, येवलेवाडी, सासवड व शांतिनिकेतन काेंढवा येथील मालमत्तांची विल्हेवाट लावून तीन काेटींपेक्षा अधिक रक्कम मिळवली अाहे. वैशाली हिने चार पाॅकलेन, दाेन राेलर, तीन जेसीबी, चार टँकर अशी सुमारे तीन ते चार काेटी रुपयांची वाहने ती संचालक असलेल्या जीवन ज्याेती कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या नावे करून ती विक्री केली असून त्याबाबत तपास करायचा अाहे. समृद्ध जीवनच्या माध्यमातून सुमारे साडेतीन हजार काेटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले अाहे.     


वैशाली माेतेवारकडून पावणेदाेन काेटींचे साेने खरेदी

फरार काळात ती राहत असलेल्या ठिकाणांवरून अातापर्यंत एकूण ९० हजार रुपये व ३५ हजार रुपये किमतीचे साेने व चांदी जप्त करण्यात अाली अाहे. समृद्ध जीवन समूहाच्या विविध कंपन्या व व्यक्तींच्या नावे असलेल्या सुमारे ३६५ मालमत्ता अातापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्या अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...