आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा दिन विशेष: पुण्यातील FTII च्या प्रवेशद्वारी विवेकानंद स्मारकाच्या प्रतिकृतीची उभारणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या प्रवेशद्वारी 'राष्ट्रीय युवा दिना'चे औचित्य साधून तरुणाईला प्रेरणादायी ठरणाऱ्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. काश्मिरच्या महिला फुटबॉल संघाची कप्तान अफसान आशिकच्या हस्ते या प्रतिकृतीचे उद्घाटन शुक्रवारी 12 जानेवारीला होणार आहे, अशी माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कंथोला यांनी दिली.
 
देशाच्या दक्षिण किनाऱ्यावर भर समुद्रात उभारण्यात आलेल्या रॉक मेमोरियलची प्रतिकृती संस्थेच्या कलाविभागातील तसेच उत्पादन विभागातील सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनीच तयार केली आहे. तरुणाईचे प्रतीक आणि भारतीय युवकांचे आद्य प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आणि पार्श्वभूमीला उसळत्या सागराची प्रतिमा असणारे रॉक मेमोरियल, संस्थेतील विद्यार्थ्यांसमोर तसेच नागरिकांसमोर सतत राहील, हा यामागील उद्देश आहे, असेही कंथोला म्हणाले. रॉक मेमोरियलची प्रतिकृती लाकडी भुसा, प्लायवुड, जिप्सम पावडर, बाबूं चटया, थर्मोकोल, ज्यूट अशा संस्थेतील कलाविभागात आणि उत्पादन विभागात उपलब्ध असणाऱ्या सामग्रीपासून तयार करण्यात आली आहे. 

 

पुतळा मात्र फायबरचा असून, त्याला मेटर फिनिशिंग केले आहे, असे निर्मिती विभागाचे प्रमुख आशुतोष कवीश्वर, प्रसाद थोरात, दीपांकन दास आदींनी सांगितले. जम्मू काश्मीरच्या फुटबॉल संघाची कप्तान आणि गोलकीपर असणारी लोकप्रिय महिला खेळाडू अफसान आशिक याप्रसंगी तरुणाईशी संवाद साधणार आहे. तिच्या खेळातील कौशल्यामुळे ती तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. 

बातम्या आणखी आहेत...