आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माउलींचा पालखी सोहळा 20 लाखांच्या नव्या रथातून; 130 किलाे जर्मन सिल्व्हरचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लक्षावधी वारकऱ्यांचा श्रद्धाविषय असणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या झगमगत्या रथातून पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान करणार आहे. नव्या रथाच्या घडणीसाठी वडगाव मावळ येथील जाधव कुटुंबाने देणगी दिली असून, रमेशभाई मिस्त्री यांच्या कुशल कारागिरीखाली नवा रथ माउलींची पालखी वाहण्यास सिद्ध झाला आहे.  रथाच्या निर्मितीसाठी सुमारे २० लाख रुपये खर्च आला.  


माउलींच्या पालखी सोहळ्याचा रथ जुना झाला होता, तसेच त्याच्या सतत दुरुस्त्या निघत होत्या. त्यामुळे नवा रथ घडवण्याचा मानस होताच, पण वडगाव मावळ येथील माउलीभक्त असणारे जाधव कुटुंबीय स्वत:हून पुढे आले आणि त्यांनी माउलींच्या पालखी सोहळ्याच्या रथासाठी देणगी दिली. त्यामुळे आता माउलींचा पालखी सोहळा नव्या रथातून प्रस्थान करणार आहे, अशी माहिती पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

 
चार महिने परिश्रम 
माउलींची सेवा म्हणून देवस्थानांसाठी मूर्ती, रथ, सजावट, पालख्या.. आदी घडवणाऱ्या मिस्त्री कुटुंबाची चौथी पिढी आता माउलींच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. माउलींच्या पालखी सोहळ्याचा नवा रथा घडवण्याचे काम आम्ही तीन भाऊ (रमेश, राजू आणि प्रकाशभाई मिस्त्री) आणि आमचे नऊ कारागीर मिळून गेले चार महिने करत होतो. 


हा नवा रथ पूर्वीच्या रथाच्या तुलनेत वजनाने थोडा कमी असला तरी अधिक मजबूत, दणकट, सुबक, तरीही भव्य स्वरूपाचा आहे. माऊलींच्या आधीच्या रथाचे खांब पातळ होते, नव्या रथाचे खांब भरीव, मजबूत आहेत, असे रथ घडवणारे कलाकार रमेशभाई मिस्त्री म्हणाले.  हा रथ घडवण्यासाठी १३० किलो जर्मन सिल्व्हरचा वापर केला आहे. तसेच १२० घनफूट सागवान लाकूड वापरले आहे, असेही मिस्त्री यांनी सांगितले.

 

माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या झगमगत्या रथातून पंढरीला प्रस्थान करणार आहे.   

बातम्या आणखी आहेत...