आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजाचा खून वैयक्तिक वादातून, भावाचे मत; भीमा-कोरेगाव दंगलीशी संबंध नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -   काेरेगाव भीमा येथील पूजा सकट या तरुणीचा मृतदेह २१ एप्रिल राेजी विहिरीत अाढळून अाला हाेता. मात्र, या गूढ मृत्यूचा काेरेगाव भीमा येथे एक जानेवारी राेजी झालेल्या दंगलीशी संबंध जाेडून राजकारण पेटवण्यास सुरुवात झाली हाेती. मात्र, मृत पूजाच्या भावानेच स्पष्टीकरण देत दाेन्ही घटनांचा एकमेकांशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. दंगलीच्या दुसऱ्या दिवशी जमिनीच्या वादातून काही लाेकांनी अामचे घर व कार्यालय जाळले हाेते. या घटनेची पूजा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हाेती, या वैयक्तिक वादातून तिचा खून केला असावा, असा संशय भाऊ जयदीप सकट याने व्यक्त केला.  


जयदीप म्हणाला, माझे काका दिलीप यांनी पूजाच्या मृत्युप्रकरणी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. काेरेगावातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे जागेत माझे घर अाणि कार्यालय अाहे.  मात्र, अामच्या पत्र्याच्या शेडमुळे शेजारी प्लाॅट असलेल्या दरेकर  अाणि वेदपाठक यांच्या जागेला किंमत येत नव्हती. हा प्लाॅट अॅड.सुधीर ढमढेरे यांना विकत घ्यायचा हाेता. ते अामच्यावर घर साेडण्यासाठी दबाव टाकत. त्यामुळे माझे वडील सुरेश सकट यांनी पाेलिसांकडे संरक्षणाची मागणीही केली हाेती. 

 

२ जानेवारी राेजी जमावाने अामचे घर, तसेच घराजवळील लहुजी सेनेचे कार्यालय पेटवून दिले. त्या वेळी मी व पूजा प्रत्यक्षदर्शी हाेताे, परंतु जमलेल्या जमावाला भिऊन अाम्ही ट्रॅक्टरजवळ अासरा घेतला हाेता. त्यानंतरही अाराेपींकडून धमक्या येत हाेत्या.  दरम्यान, २० एप्रिल राेजी रातंजन (ता.कर्जत) येथे यात्रेसाठी मी व वडील गेलाे हाेताे. अाई, बहीण बायकाे घरीच हाेते. दुसऱ्या दिवशी पूजाचा मृतदेह एका विहिरीत सापडला. तिच्या मृत्यूस धमक्या देणारेच कारणीभूत अाहेत, असा अाराेपही जयदीपने केला. 

 
मुलीच्या पित्यावरही गुन्हा
मृत पूजाचे वडिल सुरेश सकट यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दुसऱ्या गटातील दरेकर यांच्या नात्यातील एका महिलेने सकट यांच्याविराेधात अापल्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद दाखल केली. त्यावरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...