आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषक वातावरणच नाही, मान्सून पुन्हा 7 दिवसांसाठी खोळंबला; सुरुवातीलाच मोठा खंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाेषक वातावरण नसल्याने मान्सूनचा खाेळंबा झाला आहे. पुढील ६-७ दिवस मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती होणार नसल्याचे हवामान विभागाने शनिवारी स्पष्ट केले. सध्या मान्सूनची रेषा ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदिया, तितलागड, कटक, गोलपारा, बागडोग्रा येथे स्थिरावली आहे. तीव्रता कमी झाल्याने नियमित मान्सूनमध्ये खंड पडला आहे. तो पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला आहे. पूर्वेकडील राज्ये, प. बंगाल भागात तो पोहोचला. मात्र, पोषक वातावरण नसल्यामुळे गेले आठवडाभर मान्सून अडकून पडला. त्याच्या वाटचालीसाठी एक आठवड्यानंतर पोषक स्थिती निर्माण होईल, असा अंदाज अाहे. 

 

सुरुवातीलाच मोठा खंड

यंदा सुरुवातीलाच मान्सूनमध्ये मोठा खंड आला. त्याने निम्म्यावर महाराष्ट्र व्यापला. मात्र, उत्तर महाराष्ट्रात तो हवा तितका बरसलेला नाही. एका अाठवड्यानंतर मान्सूनला गती मिळेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले. केरळात २९ मे, तर महाराष्ट्रात ८ जूनला मान्सूनचे अागमन झाले. ९ जून राेजी मान्सूनने मुंबई व्यापली तसेच मराठवाड्यातील काही भाग व विदर्भही त्याने व्यापला हाेता. १० जूनपर्यंत त्यात प्रगती झाली. मात्र, त्यानंतर गती मिळाली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...