आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मित्राचे गुप्तांग कापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीबद्दल दारूच्या नशेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने त्याच्या मित्राचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उरुळीकांचन येथील मार्ग वस्ती परिसरात ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव देवांग देसाई असे असून तो येथील एका पोल्ट्रीचा व्यवस्थापक आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवेली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती परिसरात बुधवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास देसाई त्याचा मित्र सुनील कटकेबरोबर दारू पित होता. दोघांमध्ये चेष्टा मस्करी चालू असताना सुनीलने देसाईला एकटेपणावरून चिडवले. त्यामुळे देसाईने सुनीलच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे चिडलेल्या सुनीलने देसाईवर जवळच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत देसाईचे  गुप्तांग कापले . त्यानंतर देसाईला एका खोलीत बंद करून तो पसार झाला. जखमी अवस्थेतील देसाईने एका मित्राला फोन करून बोलावून घेतले आणि लोणी काळभोर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...