आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवव्या मजल्यावरून पडून पुण्यात चिमुकलीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू झालेली चिमुकली. - Divya Marathi
मृत्यू झालेली चिमुकली.

पुणे- चिंचवड येथील एका इमारतीच्या नवव्या मजल्याच्या गॅलरीतून खाली पडून दाेन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अनिका देवरत ताेमर असे मृत चिमुरडीचे नाव आहे. चिंचवड येथील मेट्राेपाॅलिटन हाउसिंग साेसायटीत ताेमर कुटुंबीय नवव्या मजल्यावर राहतात. मंगळवारी दुपारी अनिका ही घरात खेळत असताना, गॅलरीत गेली. गॅलरीतील ग्रीलवर चढून खाली पाहत असताना ताेल जाऊन ती खाली पडली.  यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास पाेलिस करत अाहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...