आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमधील मुरलीकांत पेटकर यांना पद्म पुरस्कार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  भारतासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकवणारे मुरलीकांत पेटकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत सामील झालेले मुरलीकांत सुरुवातीला बॉक्सिंग करायचे. मात्र 1965 साली पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांना अपंगत्व आले. डॉक्टरांनी स्विमिंग करण्याचा सल्ला दिला आणि अपंगत्वावर मात करत त्यांनी भारतासाठी पॅराऑलिम्पिक मध्ये पहिले सुवर्णपदक पटकावले.

 

 

मुरलीकांत पेटकर यांचा सुरुवातीचा प्रवास रंजकच आहे. मुरलीकांत यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1947 रोजी इस्लामपूर येथे झाला. मुरलीकांत राजाराम पेटकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे. ते मुळचे सांगली येथील आहेत. मात्र 1979 पासून ते पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे राहतात. मुरलीकांत हे त्यांच्या गावाकडे कुस्ती खेळत होते, मात्र कुस्तीत पाटलाच्या मुलाला धोबी पछाड दिली. त्यामुळे त्यांना गाव सोडून पुण्यात आत्त्याकडे यावे लागले. ते सिकंदराबाद येथे बॉइज बटालियन लष्करात भरती झाले.1960 साली ते लष्करात हॉकी खेळत होते परंतु काही कारणामुळे त्यांनी 1964 ला त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली. यात त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.

 


1965 साली पाकिस्तान युद्धात शत्रूशी लढताना पटेकर यांना 9 गोळ्या लागल्या.तेव्हा तीन महिने ते कोमात होते. यात काळात त्यांना अपंगत्व आले. त्यांच्या मणक्यात एक गोळी आहे. त्यामुळे त्याना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्यांना स्विमिंग करण्याचा सल्ला दिला होता. 1972 ला जर्मनी येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर जलतरणसाठी 37.33 सेकंदाचा जागतिक विक्रम करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक ही पटकावले.1975 ला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 1972 पर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदके पटकावली आहेत.

 

 

मला गोळ्या लागल्या तेव्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यावेळी लष्करातील सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी लवकर बरा झालो, अशी माहिती त्यांनी दिली. हिम्मत आणि खचून न जाता आयुष्य जगावे, तसेच घरातील व्यक्तींनी अपंग व्यक्तींना सन्मानाची वागणूक द्यावी असे देखील आवाहन केले आहे. तर क्रिकेट खेळून केवळ पैसे मिळतात, असे ते म्हणाले. पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या परिवारात आनंदी वातावरण आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...