आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 मे रोजी महाराष्ट्रदिनी \'पाणी फाऊंडेशन\'चे \'महा श्रमदान\' अभियान- आमिर खानची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी महाश्रमदान अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अभिनेता आमिर खान यांनी पुण्यात दिली. 'पाणी फाऊंडेशन'च्या वतीने पुण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात आमिर खान यांनी ही माहिती दिली.

 

आमिर खान यांनी सांगितले की, पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून राज्यात गावोगावी श्रमदान सुरू आहे. या कामाला आणखी गती मिळावी व राज्यातील इच्छूक नागरिकांना यात सहभागी होता व्हावे यासाठी येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच 1 मे रोजी महाश्रमदान अभियान राबविण्याचा निर्णय पाणी फाऊंडेशनने घेतला आहे. 

 

राज्यातील अनेक गावागावात जलयुक्त शिवारचे काम गावकरी करत आहेत. शहरी भागातील नागरिकांनी 1 मे रोजी आपल्या जवळच्या ठिकाणी जाऊन ‘महाश्रमदान’ अभियान कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनने केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता या श्रमदान करण्याची वेळ सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 4 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे. 

 

राज्यातील लाखो हात श्रमदान करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करून पाणीदार गाव व जलयुक्त शिवार यासाठी गेल्या 2 वर्षांपासून झटत आहेत. या महाश्रमदान अभियानातून राज्यातील जनतेत जनजागृती होण्यासोबतच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यास हातभार लागेल. त्यामुळे या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून दुष्काळमुक्त महाराष्ट्राला हातभार लावावा असे आवाहन पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...