आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महाराष्ट्रातही गाई-म्हशींसाठी सुरु होणार होस्टेल, प्रत्येक महिलेला दुधाळ पशुधनाचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील प्रत्येक महिलेला दुधाळ पशुधनाचे वाटप केले जाणार असून हे पशुधन सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गायी म्हशींसाठी होस्टेल उभारण्यात येईल. ही माहिती ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन दिनानिमित्त आयोजित पशुपालक महामेळावा आणि राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक कार्यशाळेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. 


या कार्यक्रमास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, महेश लांडगे, कृषि, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त कांतीलाल उमाप आदी मान्यवर उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, प्रत्येक महिलेला पशुधनाचा लाभ मिळण्यासाठी व हे पशुधन सांभाळण्यासाठी महिला बचत गटामार्फत व पशुसंवर्धन विभागामार्फत सामान्य पशुपालकांपर्यंत  शासकीय योजना पोहोचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील.

 

यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर म्हणाले, मातंग समाजातील पशुपालकांकरीता सामाजिक्‍ न्याय विभाग व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत लवकरच नवीन योजना आणणार आहे. तसेच मोबाईल व्हर्टनिटी व्हॅन प्रोग्रॅम सुरु करुन शेतक-यांच्या घरी जाऊन गाई म्हशींची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या महामेळावा व आभासी प्रशिक्षण आणि तांत्रिक कार्यशाळेकरीता राज्यभरातून मोठया संख्येने पशुपालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...