आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीटमध्ये अडकून फाटली पँट, प्रवाशाने बस नेली थेट ठाण्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएमपीच्या आसने नीट नसल्याने अनेकदा प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
पीएमपीच्या आसने नीट नसल्याने अनेकदा प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (संग्रहित फोटो)

पुणे- बसमधील फाटक्या सीटमध्ये पँट अडकून फाटल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने पुणे महानगरपालिकेची पीएमपी बस थेट पोलिस ठाण्यात नेत प्रशासनाविराेधात कात्रज पाेलिस चाैकीत तक्रार दिली. संजय शिताेळे असे तक्रारदाराचे नाव अाहे. शिताेळे हे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कात्रजला जाण्यासाठी बिबवेवाडी बसस्टाॅपवर उभे हाेते. 

 

शिवाजीनगर- जांभूळवाडी ही बस त्या ठिकाणी अाल्यानंतर ते बसमध्ये चढले. प्रवासादरम्यान बसमध्ये हात ठेवण्याच्या जागेवरील लाेखंडी पट्टी बाहेर आलेली होती. त्यात शिताेळे यांची पँट अडकून ती फाटली. यामुळे रागाच्या भरात शिताेळे यांनी बस कात्रज पाेलिस चाैकीला नेत पीएमपी प्रशासनाच्या विराेधात तक्रार दाखल केली. अापणास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून बसमध्ये अावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...