आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा दंगलीतील राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी सीआयडीकडून संशयितांचे फोटो जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमाजवळ सणसवाडी येथे १ जानेवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळे याच्यावर हल्ला करणा-या संशयितांचे फोटो सीआयडीने शुक्रवारी जारी केले. सीआयडीला हिंसाचाराची एक चित्रफितही मिळाली आहे. या संशयितांचा शोध सुरु असून या प्रकणी आधीच तीन जणांना अटक केली आहे. 

 

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला होता. शिक्रापूर भागात मृतावस्थेत सापडलेल्या राहुलच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम होती. मृतावस्थेत सापडलेल्या राहुलने शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते. या जाकीटमुळे तो जमावाच्या रोषाला बळी पडला, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांकडून ओळख पटविण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. शवविच्छेदन अहवालात राहुलच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले. होते. त्याच्या मृत्यूनंतर सरकारकडून फटांगळे कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती.

 

पुढील स्लाईडवर पहा संशयितांचे आणखी फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...