Home | Maharashtra | Pune | Pimpri Chinchwad Mayor-Deputy Mayor resigns, orders from Chief Minister

पिंपरी चिंचवडच्‍या महापौर-उपमहापौरांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्‍यमंत्र्यांनी दिला आदेश

प्रतिनिधी | Update - Jul 24, 2018, 05:33 PM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

  • Pimpri Chinchwad Mayor-Deputy Mayor resigns, orders from Chief Minister

    पिंपरी चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसे आदेश होते, अशी माहिती आहे. तत्पुर्वी, उपमहापौर शैलजा मोरे यांनीदेखील आपला राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. उपमहापौरांचा राजीनामा स्वीकारल्‍यानंतर महापौर काळजे यांनी आपला राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सुपूर्त केला.


    पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी पदांच्या हालचालींना काही दिवसांपासून वेग आला होता. शहरातील राजकीय हालचालींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तासाच्या आत महापौरांना राजीनामा देण्याचा एसएमएस मोबाईलद्वारे पाठविला. त्यानंतर आज (बुधवारी) महापौर काळजे यांनी उपमहापौर मोरे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर महापौर काळजे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.


    महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव ढाके, राहुल जाधव, शत्रूघन काटे, शीतल शिंदे या इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या सोमवारच्या दौऱ्यानंतर आज महापौर यांनी राजीनामा दिला त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत आहे. मात्र महापौर नितीन काळजे यांनी आपण वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असून कार्यकाल संपल्यानंतरदेखील दीड महिना अधिक महापौरपद भूषविले, असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. माझ्या कार्यकाळात अनेक काम चांगली केली आणि बरीच करायची राहून गेल्याचे नितीन काळजे यांनी म्हटले आहे.

  • Pimpri Chinchwad Mayor-Deputy Mayor resigns, orders from Chief Minister
  • Pimpri Chinchwad Mayor-Deputy Mayor resigns, orders from Chief Minister

Trending