आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड: क्रेन अंगावर पडल्याने तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो.

पिंपरी चिंचवड- बांधकाम साइटवर काम करणाऱ्या तीन मजुरांवर मालवाहू क्रेन पडल्याने त्‍यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड हद्दीतील डूडूळगाव येथे आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. पांडुरंग बसप्पा चव्हाण (35), भगवान गायकवाड (29), अमर राठोड (28) अशी मृत्‍युमुखी पडलेल्‍या कामगारांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार सकाळी साडेअकराच्या सुमारास डूडूळगावमध्‍ये राधे रिगल रेसिडेन्सी येथे 6 मजली इमारतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सहाव्या मजल्यावर वाळू आणि सिमेंट घेऊन जाणारा क्रेन खाली कोसळला. या अपघातात 2 कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्‍यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...