आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री, आमदारांना वेटिंग करायला लावणारे तुकाराम मुंढे आता या कारणामुळे आले चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IAS तुकाराम मुंढे.... - Divya Marathi
IAS तुकाराम मुंढे....

पुणे- सतत गैरहजर राहणा-या पीएमपीमएलच्या 158 बसचालकांना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सेवेतून बडतर्फ केले. बदली हंगामी कर्मचारी म्हणून या बसचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतू ऑगस्ट 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत हे बसचालक सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांची सेवा संपुष्टात आणल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे.  

 
बडतर्फ केलेले कर्मचारी बदली, हंगामी आणि रोजंदारीवर काम करणारे होते. या कर्मचा-यांनी सुटीचे दिवस सोडून एका महिन्यात 21 दिवस काम करणे गरजेचे होते. परंतू ही अट ते पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. तीनच दिवसांपूर्वी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 13 वाहतूक निरीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढेंनी कामात हलगर्जीपणा करणा-या  200 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिका-यांना निलंबित केले आहे. 

 

गरीब व सामान्यांसाठी काम करणारे व कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती. मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेतच पण समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहचल्या पाहिजेत अशी तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच आज कलेक्टर असूनही त्यांचे राहणीमान सामान्य आहे, तर मनाने संवेदनशील आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना आहे रे आणि नाही रे वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले.

 

एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षात तब्बल 9 वेळा बदली करण्यात आली आहे.

 

आज आपण या सदरात तुकाराम मुंढे यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा व जाणून घ्या, कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्याबाबत....