आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढे धडाका नववर्षातही सुरुच राहणार; PMPML च्या सेवेत करणार हे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे. - Divya Marathi
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे.

पुणे- पीएमपीएमएलच्या बस मार्गात व वेळापत्रकात नवीन वर्षात फेरबदल करण्यात येणार असून त्याची फेररचना करण्यात येणार आहे. पीएमपीएमएल बसच्या दिवसाला 21 हजार फेऱ्या होणार असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. 

 

 

कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभरात पीएमपीएमएलच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. पुणेकरांची लाईफलाईन म्हणुन ओळखली जाणारी पीएमपीएमएल अधिक कार्यक्षमपणे चालावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून ये-जा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, प्रसन्न पर्पलसोबतचा करार रद्द त्यांचे आधी निर्णय वादग्रस्त ठरले मात्र सर्वसामान्य पुणेकरांकडून त्यांच्या निर्णयांचे स्वागतच करण्यात आले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...