आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या लाॅजमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट, असा झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जिल्ह्यातील इंदापूर शहरात एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या नेत्याच्या लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या नेत्यासह लाॅजच्या मॅनेजरवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलांना पैशाचे आमिष दाखवून लाॅजवर आणले जात होते व त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय केला जात होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ही बाब उघड झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर शहरातील खडकपुरा भागातील रुपाली लाॅज हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा नगरसेवक अनिकेत अरविंद वाघ यांच्या मालकीचा असून तिथे अजय शिंदे हा व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. या लाॅजवर महिलांना पैशाचे आमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक तोतया गि-हाईक पाठवून याबाबत खात्री करुन घेतली त्यानंतर लाॅजवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शानाखाली छापा टाकला. लाॅजवर असलेल्या महिलांकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. पोलीसांनी वाघ आणि शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...