आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचा-याने तिघींशी केला घरोबा, दुस-या पत्नीच्या या कृत्यामुळे फुटले बिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पोलिस दलातील एक कर्मचा-याने तीन महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या दुस-या पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे त्याचे बिंग फुटले असून पोलिस उपयायुक्त डाॅ. प्रविण मुंडे यांनी त्या कर्मचा-याला शनिवारी रात्री निलंबित केले.

 

मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला विजय लक्ष्मण जाधव ( बक्कल नंबर 9888) याने पहिला विवाह झाला असतानाही ही माहिती लपवून 24 डिसेंबर 2016 रोजी दुसरा विवाह केला. पण काही दिवसांतच दुस-या पत्नीला पहिल्या लग्नाविषयी माहिती मिळाली तिने याविषयी जाब विचारताच विजय तिचा मानसिक शारिरिक व मानसिक छळ करु लागला. तिचा गर्भपात देखील केला. त्याचा जाचाला कंटाळून ती माहेरी गेली. त्यानंतर त्याने 20 डिसेंबर 2017 रोजी खेड तालुक्यातील एका मुलीशी लग्न केले. 

 

विजयच्या तिस-या लग्नाची माहिती मिळताच त्याच्या माहेरी गेलेल्या पत्नीने विजय, सासरा, दीर यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. पोलिस दलाची जनमाणसात प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपात त्याचावर गुन्हा दाखल करत त्याचे निलंबन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...