आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर यांना \'संघाची कावीळ\', माजी खासदार प्रदीप रावत यांचा निशाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोरेगाव भीमा दंगलीची साक्षीदार पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद असल्याचा व यामागे संघाचा हात असल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर भाजपचे नेते व माजी खासदार प्रदीप रावत यांनी प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांना \'संघाची कावीळ\' झाल्याचे म्हटले आहे. 

 

प्रदीप रावत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहेत मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे.त्यांना संघाची कावीळ झाली आहे. कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना, खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता, यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही, असा सत्यशोधन समितीने दिलेला अहवाल पत्रकार परिषदेत सादर केला आहे.


नऊ जणांवर गुन्हा दाखल 

कोरेगाव भीमा येथील पूजा सुरेश सकट हिचा मृतदेह रविवारी विहिरीत सापडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी ९ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत, दोघांना अटक केली आहे. दरम्यान, अाम्ही राहत असलेल्या जागेबाबत काही लाेकांशी अामचा वाद सुरू हाेता, यातूनच पूजाची हत्या झाल्याचा संशय पूजाच्या वडिलांनी पाेलिसांकडे व्यक्त केला होता त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...