आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनात साधला जाणार प्रकाशक-लेखक दुवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रकाशक-लेखक यांच्यातील दुव्याचे काम राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी “देवाणघेवाण’ या वैशिष्ट्यपूर्ण दालनाची निर्मिती बडोदे येथील साहित्य संमेलनात करण्यात येत आहे. मराठी प्रकाशकांना आणि लेखकांना त्यांच्या पुस्तकाचे हक्क गुजरातीसह इतर अमराठी बहुभाषिक प्रकाशकांना विकण्याची साेय या दालनात ‘बुकगंगा’च्या सहकार्याने केली आहे, अशी माहिती ‘सहयोगी संस्थे’चे संचालक योगेश नांदूरकर यांनी येथे दिली.  


मराठी वाङ््मय परिषद, बडोदे आयोजित ९१ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अधिक वाचकाभिमुख आणि साहित्याभिमुख करण्याचा प्रयत्न आयोजक करत आहेत. यातूनच अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचा जन्म होत आहे. ‘देवाणघेवाण दालन’ हा त्याचाच एक भाग असेल, असे नांदुरकर म्हणाले. या दालनात अनुवाद प्रक्रिया, पुस्तकांचे, लेखकांचे हक्क विक्री किंवा खरेदी तसेच अन्य संबंधित मुद्द्यांविषयीचे मार्गदर्शनही मिळणार आहे. यातून भाषाभगिनी उपक्रमाला बळ मिळणार आहे. ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर म्हणाले, ‘केवळ साहित्य संमेलनातच नाही, तर मराठी साहित्यातही अशी व्यवस्था प्रथमच निर्माण करण्यात येत आहे .

बातम्या आणखी आहेत...