आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिपिकाला चार हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी चिंचवड महापालिकेतील लेखा विभागातील एका लिपिकाला 4 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 4 हजार रूपयांची रोख रक्कमेत लाच स्वीकरताना प्रकाश जयसिंग रोहकले (वय 39, रा. पिंपलेश्वर निवास, तुळजाभवानी नगर, पिंपळे गुरव, पुणे.) या कनिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली आहे. 

 

ज्या व्यक्तीने या लिपिकाविरोधात तक्रार दिली त्यांच्याकडे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत बायोमेट्रिक मशिन्स दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट होते. संबंधित ठेकेदाराचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडे 1 लाख 64 हजार रुपयांचे बिलाचे येणे होते. मात्र, प्रकाश रोहकले यांनी फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन बिलाचा चेक देण्यासाठी 4 हजारांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. यानंतर रोहकलेला आज रोख चार हजार रूपये स्वीकारताना अटक करण्यात आली. एसीबीचे पोलिस निरीक्षक अरूण घोडके आणि सुरेखा घार्गे यांच्या टीमने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...