आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: लग्नसमारंभात चोराचा डल्ला, नवरदेवाच्या खोलीतून 2 लाख रुपये लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथील मंगल कार्यालयामध्ये लग्नसमारंभ सुरू असताना नवरदेवाच्या खोलीतून तब्बल दोन लाखांची रोकड चोराने लंपास केली आहे. ही घटना मंगळवारी (12 डिसेंबर) रोजी दुपारच्या सुमारास घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र रामचंद्र महाडिक (रा. सहकार वसाहत, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांच्या मुलाचा विवाह सोहळा ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता होता. यावेळी राजेंद्र यांनी त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 52 हजार रुपयांची रोकड दिली होती. तसेच दीड तोळे सोनंही पर्समध्ये ठेवले होते.

 

मात्र काही कामानिमित्त त्या नवरदेवाच्या रूममध्ये पर्स ठेऊन बाहेर आल्या. त्याचवेळी चोरट्याने पर्सवर डल्ला मारला. मात्र हा सर्व प्रकार मंगल कार्यालयात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याप्रकारणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...