आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या भामटयास अटक, भोपाळचा निघाला चोरटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात अशाेकपार्क याठिकाणी एका महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसका मारुन अनाेळखी इसमाने चाेरुन नेल्याचा प्रकार नऊ अाॅक्टाेबर राेजी घडला हाेता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना, दराेडा प्रतिबंधक पथकाचे पाेलीस हवालदार बशिर सय्यद यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकाॅर्डेवरील अाराेपी नजफअली ऊर्फ काळा असिफहुसेन इराणी (रा. मुरलीनगर, भाेपाळ) याने केला अाहे. तसेच ताे भिवंडी येथील एका फसवणुकीच्या गुन्हयात अाधारवाडी कारागृह, कल्याण येथे न्यायालयीन काेठडीत अाहे. त्यानुसार, सदर अाराेपीस ताब्यात घेऊन त्याचेकडे चाैकशी करुन त्याच्या जवळून एक लाख 12 हजार रुपये किंमतीचे 45 ग्रॅम वजनाचे साेन्याचे गंठण जप्त करण्यात अाले अाहे.

 

कात्रज-मुंबर्इ बायपास रस्त्यावर कात्रज येथे काैशल्या थाेरात (वय-60) या महिलेस तीन इसमांनी गाठून, तिला साेने खाली पडल्याचे सांगुन व त्यानंतर तुमचे साेने सापडल्याचे सांगुन, सदर साेने थाेरात यांना परत देण्याचे अमिष दाखवुन, त्याबदल्यात महिलेच्या अंगावरील 50 हजार रुपयांचे साेन्याचे दागिने घेवुन, महिलेची फसवणुक व दिशाभूल करत अाराेपी पसार झाले अाहेत. याप्रकरणी तीन अनाेळखी इसमां विराेधात भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...