आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: ऊस घेऊन जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पलटी, महिला जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवडमध्ये ऊस वाहून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागे रस्त्यावर घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली.

 

मिळालेल्या महितेनुसार, आज दुपारी ऊस घेऊन जाणा-या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याची घटना घडली. ट्रॉली पलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रॉली पलटल्याच्या घटनेत 1 महिला गंभीर जखमी झाली असून तिला पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उसाच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वेळ न घालवता उसाचा ढीग बाजूला काढण्यासाठी मदत केली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

 

दरम्यान, जेसीबीच्या साह्याने उलटलेली ट्रॉली बाजूला करण्यात आली. सुदैवाने या ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...