आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: पतंगाचा मांजा डोळ्यात घुसल्याने चिमुकला गंभीर जखमी, 32 टाके पडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- मकरसंक्रात चार दिवसावर आली असताना पतंगाच्या मांज्याचे दुष्परिणाम पुन्हा समोर आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवर चाललेल्या चिमुरड्याच्या डोळ्याला मांजाने कापल्यामुळे गंभीर इजा झाली आहे. या घटनेत हमजा खान हा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याची ही अवस्था पतंगाच्या मांजामुळे झाली आहे. हमजाचे कुटुंब मूळ दिल्लीचे आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये उदरनिर्वाह साठी काही वर्षापासून वास्तव्यास आहे. हमजाच्या दोन्ही डोळ्यांना ऐकून 32 टाके पडले आहेत.

 

मकरसंक्रात जवळ आल्याने लहानग्यांपासून तरुणांपर्यंत अनेकांना पतंग उडवण्याचा मोह आवरत नाही. मात्र हाच मोह हमजाच्या जीवावर बेतला आहे. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथील रस्त्यावर चुलत्यासोबत दुचाकीवर निघालेल्या हमजाच्या डोळ्याखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे. पतंग उडवणाऱ्यांमध्ये पतंग गुल करण्याची स्पर्धा लागते. अश्यातच ज्याची पतंग गुल होते तो त्याचा मांजा तसाच सोडून जातो. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे. हमजा खान हा चिमुकला त्याच्या चुलत्या सोबत उद्यानात गेला होता. मात्र, घरी परत येताना असताना हा घात झाला आणि लटकलेला प्लॅस्टिकचा मांजाने दुचाकीवर समोर बसलेल्या हमजाच्या दोन्ही डोळ्यांना कापले. यात मोठा रक्त स्त्राव झाला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर मांजावर बंदी आणावी अशी मागणी हमजाचे वडील मोहम्मद रियाज यांनी केली आहे. माझ्या मुलासोबत हा अपघात झाला, तो इतर मुलांसोबत होऊ नये त्यामुळे मांजावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली. माझ्या मुलाचे नशीब बलवत्तर होत नाहीतर गळा कापला गेला असता तर मुलाचे काय झाले असत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील जखमी मुलाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...