आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन डाॅलरच्या माेहापायी गमावले चार लाख रुपये, मद्य वितरकाची 48 लाखांची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येरवडा येथे एका दुकानदारास अनाेळखी तीन इसमांनी अमेरिकन डाॅलरच्या नाेटा कमी किंमतीत देण्याचे अमिष दाखवुन, प्रत्यक्षात दुकानदाराच्या हातात साबणाची वडी व वृत्तपत्राचे कागदाचे बंडल देत, चार लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार घडला अाहे. याप्रकरणी तीन अनाेळखी इसमांविराेधात येरवडा पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

याबाबत विशाल गायकवाड (वय-23,रा.लाेहगाव,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली अाहे. तीन दिवसांपूर्वी गायकवाड हे दुकानात हजर असताना, एक इसमाने त्यांना 20 अमेरिकन डाॅलर दराच्या 1673 नाेटा असल्याचे सांगितले. त्यापैकी 20 अमेरिकन डाॅलची एक नाेट देऊन त्यांना अाणखीन जादा नाेटा देण्याचे अमिष दाखवुन, त्यास येरवडयातील अांबेडकर चाैका जवळ बाेलविण्यात अाले. अाराेपी इसम हा त्याच्या दाेन साथीदांसह त्याठिकाणी येऊन त्याने कापडी पिशवीत अमेरिकन डाॅलर असल्याचे गायकवाड यांना भासवून त्यांचेकडून चार लाख रुपये दिले. मात्र, त्याबदल्यात कापडी पिशवीत हातरुमालात वृत्तपत्राचे कागद, साबणाची वडी बांधून देऊन हातचालाखी करुन सदर रकेमची फसवणूक करण्यात अाली अाहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मद्य वितरकाची डीलरशीपच्या अमिषाने 48 लाखांची फसवणूक...

बातम्या आणखी आहेत...