आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: जुन्नरमध्ये विहिरीत बुडून दोन भावडांचा दुर्देवीरित्या मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यात सुलतानपूर येथील विहिरीत बुडून दाेन सख्ख्या भावांचा दुर्देवीरित्या मृत्यु झाला अाहे. अरु दशरथ अातकरी (वय-6) व साहिल दशरथ अातकरी (5) अशी मयत झालेल्या मुलांची नावे अाहेत.

 

दशरथ अातकरी व त्यांची पत्नी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याचे सुमारास शेतामध्ये जनावारांसाठी गवत कापून अाणण्याकरिता गेले हाेते. त्यावेळी शेता जवळच खेळत असलेली दाेन मुले खेळत खेळत अचानक ताेल जाऊन विहिरात पडली व त्यांचा मृत्यु झाला. मुले कुठे दिसेना म्हणून अार्इने शाेधाशाेध घेतला असता मुले विहिरीत पडल्याचे दिसून अाले. याप्रकरणी पुढील तपास नारायणगाव पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे करत अाहे.

बातम्या आणखी आहेत...