आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: भोसरीमध्ये तरूणावर गोळीबार, मॉलमधील भांडणातून घडला प्रकार, आरोपीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. एकमेंकात झालेल्या वादातून भोसरी येथे एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. पंकज फुगे असे गोळीबार झालेल्या तरूणाचे नाव आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज पिंपरी येथील सिटी मॉलमध्ये पंकज फुगे (वय-२३ रा. भोसरी) आणि अंजिक्य माने यांच्यात वाद झाला होता. याच वादातून दुपारी साडेतीनच्या सुमारास पंकज फुगे याच्यावर भोसरीच्या अंकुशराव नाट्यगृहाच्या परिसरात गोळीबार करण्यात आला. यात त्याच्या पाटीला गोळी चाटून गेली. यामध्ये पंकज फुगे हा जखमी झाला आहे. गोळीबार करणार्‍यांची ओळख पटली असून याप्रकरणी अजिंक्य माने यास भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. 

 

दरम्यान, पिंपरी- चिंचवडमध्ये गोळीबाराचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी भोसरीच्या गवळीमाथा येथे ३४ वर्षीय तरुणांवर गोळीबार करण्यात आला होता. यात विजय घोलप हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तसेच याच घटनेच्या एक दिवस अगोदर दुपारीच्या वेळी अज्ञात इसमानी पिंपरीतील साधू वासवाणी चौकात हॉटेलमध्ये संतोष कुरवत यांच्या गोळीबार केला होता.

बातम्या आणखी आहेत...