आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: अाजारी 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीसह घरात गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आजारपणामुळे मृत्यू पावलेल्या मुलाच्या विरहात संगणक अभियंत्याने पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना पुण्यात शुक्रवारी घडली. जयेश कुमार पटेल (३४), भूमिका पटेल (३०) व नक्ष पटेल (४) अशी मृतांची नावे अाहेत. नक्षचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा अन्य दुखापत आढळून न आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  


पटेल कुटुंबीय मूळचे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रहिवासी अाहे. जयेश हा हिंजवडीतील ‘क्यू लाॅजिक’ या अायटी कंपनीत साॅफ्टवेअर अभियंता असून त्याला महिन्याला दीड लाख रुपये इतका भरघाेस पगार हाेता. त्याची पत्नी भूमिका ही उच्चशिक्षित असून गृहिणी हाेती. बाणेर-पाषाण लिंक राेडवरील वसंत विहार या साेसायटीत त्यांनी दिवाळीत ८० लाख रुपयांचा फ्लॅट घेतला व त्या ठिकाणी ते मुलासह राहण्यास अाले हाेते. दरम्यान, मागील २ दिवसांपासून त्यांच्या घरातून काेणतीच हालचाल दिसत नसल्याने तसेच मित्रांच्या फोनला दोन दिवसांपासून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी पटेल यांचा घराचा दरवाजा गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाजवला. त्या वेळी काही तरी संशयास्पद घडल्याची जाणीव झाल्याने त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. 


पाेलिसांनी फ्लॅटच्या गॅलरीतून घरात प्रवेश केला. त्या वेळी पटेल कुटुंबीय मृतावस्थेत पाेलिसांना आढळून अाले. जयेश व भूमिका यांच्या गळ्याभाेवती दाेरीचे व्रण, तर मृत नक्षच्या ताेंडातून फेस अालेला हाेता. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठवले.  

 

नक्षचा मृतदेह दाेन दिवसांपासून घरातच-


पाेलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश व भूमिका पटेल यांचा मुलगा नक्षला जन्मजात फिट येण्याचा अाजार हाेता. या अाजारामुळे हे दांपत्य नैराश्यात हाेते. त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याने दांपत्याने  अात्महत्या केली असावी, अशी शक्यता अाहे. मुलावर काेणत्या रुग्णालयात उपचार सुरू होते तसेच पटेल यांच्या नातेवाइकांची चाैकशी अद्याप करावयाची अाहे. याप्रकरणी घटनास्थळी अात्महत्येपूर्वीची चिठ्ठी किंवा अन्य मजकूर सापडला नसून पाेलिस सखाेल चाैकशी करत अाहेत.  

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, मुलाचे हाल बघवत नसल्याने उचलले पाऊल...

बातम्या आणखी आहेत...