आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरीत किरकोळ भांडणामधून विवाहित दांपत्याची तर साखरपुडा मोडल्याने तरूणीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंकी प्रजापती - Divya Marathi
पिंकी प्रजापती

पिंपरी-चिंचवड- भाेसरी परिसरातील एक नवदांपत्याने घरगुती वादातून राहत्या घरात गळफास घेऊन अात्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस अाला अाहे. हरिहर प्रजापती (वय-25) व पिंकी प्रजापती (17) असे अात्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव असून ते मूळचे मध्यप्रदेशातील दातिया जिल्हयातील भण्डेर येथील रहिवासी अाहेत. 

 

पिंकी प्रजापती व हरिहर प्रजापती यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले हाेते व एक महिन्यापुर्वी ते कामानिमित्त भाेसरी येथे रहावयास अाले हाेते. गुरुवारी सायंकाळी हरिहर कामावरुन घरी अाला असता, घराचा दरवाजा उघडल्यावर त्यास पिंकीने अाेढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेला दिसला. हे दृश्य पाहून ताे जाेरात अाेरडला व त्यानेही पिंकीच्या अाेढणीनेच गळफास घेत अात्महत्या केली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पाेलीसांना माहिती दिल्यानंतर, भाेसरी पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पाेलीसांना पिंकीने अात्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली हिंदी भाषेतील चिठ्ठी मिळून अाली. त्यामध्ये ‘मैंने हरिहर काे खाने पे बुलाया लेकीन अाे अाया नही, फाेन किया लेकीन फाेन भी उठाया नही, इसलिए मै तुझे छाेड के जा रही हूॅं’ असा अाशय हाेता. पाेलीस याप्रकरणी पुढील तपास करीत अाहे. 

 

कुजलेल्या अवस्थेत नर्सचा मृतदेह मिळाला-

 

भाेसरीतील अादिनाथनगर येथील एका हाॅस्टेल मध्ये एका नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सायंकाळी मिळून अाला. भारती ठाकरे (वय-31) असे अात्महत्या केलेल्या नर्सचे नाव असून तिने दाेन दिवसांपूर्वीच अात्महत्या केली असावी असा अंदाज पाेलीसांनी वर्तवला अाहे. भारती मूळची विर्दभातील रहिवासी असून ती भाेसरीत हाॅस्पिटल जवळच भाडयाने रुम घेऊन राहत हाेती. तिच्या खाेलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने, खाेलीचा दरवाजा ताेडला असता तिने अात्महत्या केल्याचे दिसून अाले. साखरपुडा मोडल्याने भारतीने हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.