आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गंधीमुक्त कचरा डेपोत इंदापूरच्या नगराध्यक्षांनी साजरा केला वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- महानगरातून जमा होणारा कचरा कोठे टाकायचा, या गंभीर प्रश्नांवर आंदोलने होतात. मात्र, इंदापूरमध्ये कचऱ्यापासून नैसर्गिक खतनिर्मिती सुरू केली आहे. जैविक खतनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी कचरा डेपोत जाऊन वाढदिवस साजरा केला. दुर्गंधीमुक्त चकाचक कचरा डेपोवर स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी केक कापून तो सर्वांना भरवला. कचरा डेपोत निर्मित खताचा वापर करून वृक्षारोपण केले.

 
इंदापूर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने तयार केलेल्या जैविक जिवाणूंची फवारणी याकामी इंदापूर नगर परिषदेला मोलाची मदत केली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील प्रमुखांनीदेखील इंदापूरच्या कचऱ्याला वैतागून नगर परिषदेकडे निवेदन दिले होते. मात्र, सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक सागर कदम व ज्ञानेश्वर शिंदे यांनी कचरा दुर्गंधीमुक्त करणारे जैविक द्रव विकसित केले अन् इंदापूर नगर परिषदेच्या कचरा डेपोत या द्रवाच्या फवारणीमुळे कचऱ्याचे विघटन होऊन परिसर दुर्गंधीमुक्त झाला. गांडूळ खत प्रकल्प उभारल्याने शहरातील उद्यानांकरिता उत्तम खतनिर्मिती झाली. यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य केले. 

 

कचऱ्यावर फवारणी
 गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छता सेविकांद्वारे कचरा डेपोतील प्लास्टिक बाजूला करून ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. फक्त विघटन होणाऱ्या कचऱ्यावर जैविक द्रवाची फवारणी केली जाते, तर कचऱ्यापासून प्लास्टिक वेगळे केले जाते. दुर्गंधीमुक्त कचरा डेपोत वाढदिवस साजरा करताना आपण कचरा डेपोजवळ केक कापला.
- अंकिता शहा, नगराध्यक्ष, इंदापूर नगर परिषद . 

बातम्या आणखी आहेत...