आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: 6 आयटी इंजिनियरचा दारू पिऊन धिंगाणा व पोलिसांना धक्काबुक्की, हाती पडल्या बेड्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील हडपसर भागातील अमनोरा पार्क परिसरातील एका सोसायटीत दारू पिऊन धिंगाणा घालणे सहा आयटी इंजिनियर तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. सोसायटीतील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिस दाखल झाले मात्र त्यांनाच नशेत धुंद असलेल्या आयटीतील तरूणांनी धक्काबुक्की केल्याने त्यांना बेड्या ठोकाव्या लागल्या. शनिवारी रात्री (19 मे) ही घटना घडली.

 

याबाबतची माहिती अशी की, हडपसर भागातील अमनोरा पार्क परिसरातील व्ही कंट्री टॉवर या सोसायटीत आयटी इंजिनियर असलेला रोहित वांगणू राहतो. त्याच्या फ्लॅटमध्ये शनिवारी त्याचे पाच मित्र पार्टीसाठी जमले होते. रात्री उशिरा दारू पिल्यानंतर त्यांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यानंतर सोसायटीतील लोकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर दोन पोलिस कर्मचारी तेथे गेले असता या सहा आयटी इंजिनियरनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी हे सर्व तरूण दारूच्या नशेत होते. पोलिसांना धक्काबुकी झाल्यानंतर त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यानंतर तेथे आणखी काही पोलिस कर्मचारी आले व नशेत धुंद असलेल्या तरूणांना अटक करून घेऊन गेले. 

 

रोहित वांगणू (वय-30), अभिषेक जेमिनी (वय-24), उत्कर्ष शर्मा (वय-24), चंदन भंडारी (वय-24), अमनदीप शर्मा (वय-27, रा. व्ही कंट्री टॉवर, अमनोरा, हडपसर) आणि राकेश शर्मा (वय-28, रा. निसर्ग सिटी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुढील तपास हडसपर पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...