आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुण्यातील भवानी पेठ परिसरातील दी मुस्लिम काे-अाॅपरेटिव्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयासह बँकेच्या १७ शाखांत अशा एकूण ३२ ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीअाय) पथकाने छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. नाेटबंदीच्या काळात सदर बँकेच्या माध्यमातून सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या एक हजार अाणि पाचशे रुपये किमतीच्या नाेटांची १०० अाणि ५० रुपयांच्या नाेटात बेकायदेशीररीत्या अदलाबदल करण्यात अाल्याचा दावा सीबीअायने केला अाहे. याप्रकरणी बँकेच्या नऊ संचालकांविराेधात सीबीअायने बँकिंग नियमांचे उल्लंघन तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला अाहे.
यासाेबतच दाेषी व्यक्तींच्या पुणे, लाेणावळा, बारामती याठिकाणच्या निवासस्थानांवरही सीबीअायच्या पथकाने छापे टाकून तपासणी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. याप्रकरणी बँकेच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. केंद्र सरकारने नाेटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकेतील विश्वस्तांनी संगनमताने कट रचून जुन्या चलनातील १००० व ५०० रुपयांच्या विविध शाखांतील सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या नाेटा या १०० अाणि ५० रुपयांच्या चलनात रूपांतरित केल्या. बँकेच्या विविध शाखांतील छाेट्या नाेटांची प्रमुख नाेंदवही बदलून त्याजागी दुसरी नवीन नाेंदवही ठेवून त्यातील अाकडेवारीत बदल करण्यात अाल्याचे तपासात निष्पन्न झाले अाहे.
ठेवीदारांनी घाबरू नये : इनामदार
दी मुस्लिम काे-अाॅप बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी याप्रकरणी पत्रकाद्वारे सांगितले, सीबीअायच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या एक-दाेन नाेंदवह्यांच्या प्रती घेतल्या. यापूर्वीही सीबीअाय अधिकारी सदर बँकेत येऊन गेले अाहेत. मात्र, त्यांनी काेणत्या कारणासाठी बँकेला भेट दिली हे सांगितले नाही. बँकेच्याच दाेन संचालकांनी बँक व माझ्याविरोधात जाणूनबुजून तक्रारी केल्याचा किंवा सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीच्या कर्ज प्रकरणाला ज्यांनी विराेध केला त्यांच्याच राजकीय डावपेचाचा हा भाग असण्याची शक्यता अाहे. बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी या प्रकारामुळे घाबरू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.