आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार करणार राज ठाकरेंचा \'सामना\'; 3 जानेवारीला पुण्यात होणार प्रकट मुलाखत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत येत्या 3 जानेवारी रोजी पुणे येथे होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवारांची मुलाखत घेणार आहेत. पुण्यातील BMCC कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात येत आहे. कवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. चौकटीबाहेर जाऊन महाराष्ट्राला पुढील 50 वर्षे लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सुरू केला. अनेक नावांवर चर्चा झाली. दोन अडीच महिन्यांपासून हा शोध सुरू होता. ‘जागतिक मराठी अकादमी’चे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर शरद पवार यांची आणि राज ठाकरे यांची संमती घेत चर्चा होऊन 3 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही पुढाकार घेतला. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...