आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- काँग्रेस पंतप्रधान मोदी हे संविधान आणि आरक्षण विरोधी असल्याचा अपप्रचार करुन 2019 मध्ये सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडाधड धावा करणा-या आयपीएलमधील टीमच्या कॅप्टनसारखे आहेत, तर मी त्यांच्या संघातील फलंदाज आहे त्यामुळे कांग्रेसने कितीही आकांडतांडव केला तरी 2019 ची मॅच आम्हीच जिंकणार असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले आरपीआयच्या अधिवेशनाची माहितीसाठी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आठवले यांनी सांगितले की मोदी मजबूत नेते आहेत, त्यांनी सत्तेत आल्यापासून आजपर्यंत अनेक कामे केली आहेत. यउलट कांग्रेसने आपल्या कार्यकाळात जातीवाद जोपासण्याचे काम केले आहे. राहुल गांधी नेहमी मोदींवर दलितविरोधी असल्याचा आरोप करतात पण तसे नाही. दलितांचे भले करण्याची ताकद नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे एनडीएसोबतच जाणे दलितांच्या हिताचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.