आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करा; रामदास आठवलेंनी केली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा येथील दंगल पूर्वनियोजित असून पुरावे पोलिसांकडे आहेत. या दंगलीमागे असलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

सणसवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे, या संदर्भात ग्रामीण पोलिसांना सूचना केल्या आहेत असेही आठवले यांनी म्हटले आहे. या संपूर्ण हिंसाचारात 9 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होणार नाही. दलितांना आपले मित्र मानून काम करा असाही सल्ला आठवले यांनी दिला. कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे काही प्रमाणात पोलिसांचे अपयश होते असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी रोजी हिंसाचार उसळला. त्यानंतर या हिंसाचाराचे पडसाद 2 जानेवारीला महाराष्ट्रभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता आज पत्रकार परिषद घेऊन रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा प्रकरण म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिग्नेश मेवाणीला चांगला नेता व्हायचे असेल तर त्याने उलटसुलट भाषण करू नये असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...