Home »Maharashtra »Pune» Relative Raped On 14 Years Minor Girl At Sanghvi, Pune

पिंपरी-चिंचवड: 14 वर्षीय मुलीवर नातेवाईकाचा बलात्कार, आरोपी गजाआड

दिव्यमराठी वेब टीम | Jan 12, 2018, 13:07 PM IST

  • पिंपरी-चिंचवड: 14 वर्षीय मुलीवर नातेवाईकाचा बलात्कार, आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, 48 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेते. तिची आई आणि पीडित मुलगी ही वडिलांपासून वेगळ्या राहतात. त्यांच्यासोबत 48 वर्षीय नातेवाईक राहत होता. मात्र गेल्या जुलै महिन्यापासून आरोपी नातेवाईक हा पीडित मुलीचा वारंवार विनयभंग करून अत्याचार करत होता. गुरूवारी दुपारी घरात कोणी नसतानाही संबंधित आरोपीने मुलीवर अत्याचार केला.

ही घटना जर कोणाला सांगितली तर तुझ्या आईसह तुला जीवंत ठेवणार नाही असे सांगत जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीला दिला. त्यामुळे 14 वर्षीय मुलगी घाबरून गेली होती. वारंवार होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून तिने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर दोघींनी सांगवी पोलिस स्थानक गाठले व फिर्याद दिली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एम. टी. शिंदे करत आहेत.

Next Article

Recommended