आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा टाकून महिलेवर केला होता बलात्कार, आरोपीने कोठडीत गळफास घेऊन केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- घोडेगाव पोलिस स्टेशन अंतगर्त सबजेलमध्ये दोराडा आणि बलात्काराच्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आरोपीने एका वर्षापूर्वी एक घरावर दरोडा टाकला होता आणि महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. 

 

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलदास उर्फ कुक्या काळे (मूळ गाव श्रीगोंदा, अहमदनगर) याने लांडेवाडी येथील घरात दरोडा टाकून 45 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. तर अहमदनगर पोलिसांनी त्याला दुस-या एका गुन्ह्यात अटक केली होती. या आरोपीला अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्याला घोडेगाव सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने गुरुवारी कोठडीत गळफास लावून आपले जीवन संपविले. 

बातम्या आणखी आहेत...