आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- बंद फ्लॅटचे लॅच तोडून नोकराने लांबवला एक कोटीचा एेवज, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चिंचवडमधील निगडी परिसरातील एक बंद फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच तोडून नोकराने एक कोटीचा एेवज लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी नेपाळी नोकरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. ही घटना भक्ती शक्ती चौकाजवळ शनिवारी रात्री घडली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार विनोद बंसल यांनी फिर्यादी दिली आहे. बंसल यांचा भक्ती शक्ती चौकाजवळ फ्लॅट आहे.  काल त्यांचे कुटुंब पुण्यात कार्यक्रमासाठी गेलं होतं, त्यावेळी फ्लॅट बंद असतानाचा नोकरानेच घरातील 80 लाखांचे सोने आणि 17 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण 97 लाख 20 हजाराचा  एेवज चोरुन नेला. ही चोरी सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून निगडी पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...