आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वतीने प्रथमच न्यायालयात वकील दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काेरेगाव भीमा दंगल भडकावल्याच्या अाराेपावरून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविराेधात शिक्रापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. या प्रकरणी अनिता सावळे या सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिली अाहे. या दंगलीत संजय भालेराव यांची कार जळाल्याने त्यांनीही भिडे यांची ब्रेनमॅपिंग, पाॅलिग्राफ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली अाहे. याप्रकरणी भिडे यांची बाजू मांडण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने केली हाेती, त्यानुसार प्रथमच भिडे यांच्या वतीने सुमारे चार महिन्यांनंतर प्रथमच अॅड. पुष्कर दुर्गे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयात बुधवारी दाखल झाले.

    
अॅड.दुर्गे म्हणाले, तक्रारदारांनी भिडे यांचे नाव मनाेहर विनायक कुलकर्णी (५९) असे सांगितले अाहे. मात्र, संभाजी भिडे (८१)असे त्यांचे नाव असून ते दुरुस्त करण्यात यावे. तसेच भिडेंविराेधातील व्हिडिअाे फुटेज, व्हाॅट्सअॅप चॅटिंगची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...