आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडेंचे वक्‍तव्‍य सामाजिक व धार्मिक तेढ करणारे, तात्‍काळ गुन्‍हा दाखल करा- संभाजी ब्रिगेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'मनू हा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्‍यापेक्षा श्रेष्‍ठ होता', या संभाजी भिडे यांच्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यावर संभाजी ब्रिगेडने संताप व्‍यक्‍त केला असून याप्रकरणी भिडेंवर तात्‍काळ गुन्‍हा दाखल करावा, अशी मागणी पुणे पोलिसांना केली आहे. पोलिसांनी तात्‍काळ भिडेंवर गुन्‍हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलन करण्‍यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.  


शनिवारी 7 जुलै रोजी जंगली महाराज मंदीरामध्‍ये संभाजी भिडे यांनी, 'जगतगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍यापेक्षा मनु एक पाऊल पुढे होते. व तेच सर्वश्रेष्‍ठ आहेत.', असे विधान केले होते. यावर जोरदार आक्षेप घेत हे विधान वादग्रस्त, संविधान विरोधी व घटनाबाह्य असल्‍याचे ब्रिगेडने म्‍हटले आहे. शिवाजी नगर पोलिसस्‍टेशनमध्‍ये आज सोमवारी दिलेल्‍या तक्रार अर्जामध्‍ये ब्रिगेडने म्‍हटले आहे की,  'मनुस्‍मृतीचे समर्थन करणे व महाराष्‍ट्राची अस्मिता असणा-या जगतगुरू संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्‍वर महाराज यांना कमी लेखणे, त्‍यांचा अवमान करणे अतिशय वादग्रस्‍त आहे. या वक्‍तव्‍यामुळे आमच्‍या भावना दुखावल्‍या असुन यामुळे सामाजिक व धार्मिक तेढ होऊ शकतो. यामुळे त्‍यांच्‍यावर तात्‍काळ गुन्‍हा दाखल करावा.'  

बातम्या आणखी आहेत...