आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरच्या वाळू माफियांकडून चार पिस्तूल जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघाेली येथुन दाेन वाळु माफियांना अटक करुन, त्यांच्या ताब्यातून चार गावठी पिस्टल, दहा काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला अाहे. राजेंद्र ऊर्फ राजा माणिक राठाेड (वय-32,मु.रा.निमगाव मायंबा, ता.शिरुर कासार, जि.बीड) व धाेडिंभाऊ महादू जाधव (55,रा.निघाेज, ता.पारनेर, अहमदनगर) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहे. 

 

स्थानिक गुन्हे अन्वेष्ण शाखेचे पाेलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले की, याप्रकरणी संबंधीत अाराेपीं विराेधात लाेणीकंद पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. राजा राठाेड याचा अहमदनगर परिसरात वाळूचा व्यवसाय असून त्याने यापूर्वी गंगापूर, जि.अाैरंगाबाद तसेच पुणे जिल्हयातील दाैंड, शिरुर येथे ही वाळू व्यवसाय केलेने तेथील वाळू माफियांशी व गुन्हेगारांशी त्याचे संबंध अाहेत.

 

काही दिवसांपूर्वीच पारनेर येथील तहसीलदार मॅडम यांचेवर वाळू माफियाने केलेल्या हल्ल्यामुळे महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवार्इ करणेसाठी विशेष माेहीम राबविल्यामुळे ताे वाघाेली येथे वास्तव्यास येवून हाॅटेल व्यवसाय सुरु करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पथकास मिळाली हाेती.

 

अाराेपी राजा राठाेड हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी पुणे जिल्हयात शिरुर, राजगड, दाैंड तसेच अहमदनगर, बीड, अाैरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हयातील पाेलीस स्टेशनला दराेडा, जबरी चाेरी, अार्म अॅक्ट प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असून सुमारे एक वर्षापासून शिरुर पाेलीस स्टेशनला दाखल असलेल्या मारामारीचे गुन्हयात ताे फरार हाेता.

बातम्या आणखी आहेत...