आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल शिरोळेंपेक्षा मी उजवा, पुण्याची लोकसभा मीच लढवणार -संजय काकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येत्या निवडणुकीत अनिल शिरोळेंपेक्षा मी उजवा आहे, त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार अशी घोषणा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केली आहे. या निवडणुकीत साडेतीन लाख मतांनी आम्ही निवडून येऊ असा दावा काकडे यांनी केला आहे. शुक्रवारी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःला आगामी लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केले.


भाजपचे पुण्यातील चार आमदार डेंजर झोनमध्ये आहत, त्यांचा पराभव होऊश शकतो, असा दावा काकडे यांनी केला आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांनी मतदार संघाचे सर्वेक्षण केले. या सर्वक्षणाच्या निष्कर्षावरून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपणच योग्य असल्याचे म्हणत त्यांनी स्वत:ला उमेदवार घोषित केले आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...