आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: चायनीज मांजाने जेष्ठाचा गळा कापला, थोडक्यात जीव वाचला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडीत पतंगाच्या मांजाने पुन्हा एकदा एकाला जखमी केले आहे. या पतंगाच्या मांजामुळं आता एक ज्येष्ठ नागरिक थोडक्यात बचावले. मांजामुळं त्यांचा गळा कापला गेला असून वेळीच त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मांजा बाजूला केला. मात्र त्यामुळे त्यांच्या हाताचे बोट कापले गेले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. मात्र दोन दिवसानंतर ही घटना समोर आली.

 

याबाबतची माहिती अशी की, जेष्ठ नागरिक रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (वय-62 रा. ज्ञानेश्वर वसाहत, काळेवाडी) हे बुधवारी सायंकाळी सहा वाजता दुचाकीवरून निघाले होते. काळेवाडीच्या डी मार्ट येथील सिग्नलवर ते थांबले. तेव्हा अचानकपणे मांजा त्यांच्या चेहऱ्यावर आला. मांजाने त्यांचा चष्मा खाली पडला. मात्र मांजा गळ्याला अडकला. पतंग उडवणारा मांजा खेचत असल्याचे रंगनाथ याच्या लक्षात आले. त्यामुळे आपला गळा कापला जाऊ शकतो हे ध्यानात घेत त्यांनी मांजा हाताने बाजूला काढला. मात्र, तोपर्यंत गळ्याला आणि हाताच्या बोटाला इजा झाली आहे. 

यात गळ्याला दोन टाके तर उजव्या हाताच्या बोटाला सहा टाके पडले आहेत. 

 

मंगळवारी काळेवाडीतीलच राजवाडेनगर मध्ये तीन वर्षीय हमजा खान या चिमुकल्याच्या डोळ्याला मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या चेह-यावर व डोळ्यावर 32 टाके पडले आहेत. तेव्हा त्याच्या वडिलांनी मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशीच ही घटना घडली. त्यामुळे चायनीज मांजावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...