आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे पती व IPS अधिकारी उदय शुक्ला यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे शहराच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे पती व वरिष्ठ IPS अधिकारी उदय शुक्ला यांचे रविवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. 

 

आज सकाळी (सोमवार 28 मे) त्यांच्यावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्य शुक्ला यांना कर्करोग होता. मागील एक-दोन वर्षापासून ते   यावर उपचार घेत होते. मात्र, गेल्या आठवडयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

 

उदय शुक्ला हे मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य सुरक्षा आयुक्त म्हणून सध्या कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी व पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...